Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त गृहपयोगी वस्तूंचे वाटप

औंध : आयुष्यभर कष्टकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या कडून गरजू महिलांना नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते गृहपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.

अण्णाभाऊंच्या १०२ व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य टिळकांच्या स्मृतिदिनानिमित्त दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुनील माने यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवाजीनगर भाजपा सरचिटणीस आनंद छाजेड, भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, अरुण बागडी, संकेत कांबळे, सुनील दैठणकर, अनिल माने, प्रतिक वाघमारे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनील माने म्हणाले, अण्णाभाऊ यांनी आयुष्यभर दीन दलित आणि कामगारांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. कष्टकरी लोकांचे आयुष्य सुखकर व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. दलित,शोषित, श्रमिक यांच्या व्यथा, वेदनांना त्यांनी आपल्या साहित्यातून वाचा फोडली. या महापुरुषाच्या विचारांना कृतीतून वंदन करण्यासाठी त्यांच्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, फ्लेक्स आणि इतर खर्चाला फाटा देत गरजू महिलांना आज आम्ही गृहपयोगी साहित्य वाटप केले. अण्णाभाऊंच्या शतक महोत्सवी जयंती निमित्त आम्ही कॅटलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे साहित्य, त्यांचे जीवनचरित्र, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे http://www.annabhausathe.com या वेबसाइटवर एका क्लीकवर उपलब्ध करून दिले आहे. अशाप्रकारची जगातली ही पहिली वेबसाईट आहे. आजच्या तरुण पिढीला अण्णाभाऊंचा इतिहास समजावा त्यातून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी हा त्या पाठीमागील उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading