शाळा-महाविद्यालयांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी – डॉ. गजानन एकबोटे
पुणे :२७ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न,कला विज्ञान आणि महाविद्यालयामध्ये प्रा.सौ. डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नातून इंडियन ओवरसीज बँकेकडून एंजल प्लेयर चा हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.गजानन एकबोटे उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यास प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न महाविद्यालय नेहमीच कटीबद्ध असते असे ते म्हणाले.शिक्षणाचा केंद्रबिंदू नेहमीच विद्यार्थी हवा असे ते म्हणाले.विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे ही सर्वच शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे, शाळा-महाविद्यालयांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत करावी असे त्यांनी नमूद केले .
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही शिक्षकांनी स्थापन केलेली संस्था आहे.शिक्षकांनी संचलन केलेली ही संस्था आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते इथे घट्ट असे आहे,विद्यार्थ्यांना सर्वातोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तळागाळातील लोकांसाठी आपण काम केले पाहिजे,ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करा.वाचनानेच आपल्याला अनेक संकल्पना लक्षात येतात .आपण खूप वाचले पाहिजे. आपली शब्दशक्ती वाढवली पाहिजे ,असे इंडियन ओवरसीज बँके,पुणे चे रिजनल ऑफिस चे जनरल मॅनेजर गोपाल एस म्हणाले ,स्टीव्ह जोब्ज्स,आईनस्टाईन यांची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. १९३७ पासून इंडियन ओवरसीज बँकेने लोकांना सेवा द्यायला सुरुवात केली आहे. तुमच्या योग्य कल्पना तुम्ही घेवून आलात तर बँक तुम्हाला आर्थिक सहकार्य नक्की करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या हिताबाबत नेहमी दक्ष असते असे उद्गार सहकार्यवाह आणि महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्ष डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांनी काढले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.राजेंद्र झुंजारराव यांनी केले .महाविद्यालयाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी डॉ.शुभांगी पुराणिक यांनी केले .या कार्यक्रमाला इंडियन ओवरसीज बँकेचे पुणे विभागाचे जनरल मॅनेजर गोपाल एस , असिस्टंट मॅनेजर रवी के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.त्याबरोबर दिव्यांग विद्यार्थी ,त्यांचे पालक ,शिक्षक,शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डॉ. वैजयंती जाधव यांनी केले.
