Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

ब्राह्मण महासंघ पिरंगुटमध्ये हॉस्पिटल उभारणार

पुणे : ब्राह्मण महासंघ पिरंगुटमध्ये ५० खाटांचे हॉस्पिटल उभारणार असल्याची माहिती अध्यक्ष आनंद दवे यांनी सोमवारी सायंकाळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.पुणे परिसरात रुग्णसेवेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्राह्मण महासंघ संचलित मैत्रेयी महिला उद्योगिनी संस्थेच्या कॉटन विभागाचा उदघाटन सोहळा आज मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे सभागृह (टिळक रस्ता) येथे पार पडला.पतसंस्था, ग्राहक भांडार, ‘देसी’ या शैक्षणिक संस्थेनंतर महिला आघाडीने सर्व प्रकारचे युनिफॉर्म, हॉस्पिटल ऍप्रन आणि रेनकोटचे स्वतःचे उत्पादन सुरु केले आहे.त्याच बरोबर लवकरच महासंघ संचालित 50 बेड चे हॉस्पिटल पण पिरंगुट येथे सुरु होत असल्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी जाहीर केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘अभि ग्रुप’ चे जितेंद्र जोशी उपस्थित होते ,  शीतल अर्जुनवाडकर यांचे महिलांचे विश्व या विषयावर व्याख्यान झाले.जनता बँकेच्या नवनिर्वाचित संचालक अलका पेटकर,मनोज तारे, राजू कुलकर्णी, रसिका घाणेकर,मदन सिन्नरकर, मयुरेश अरगडे, हर्षद ठकार, लता दवे, अर्चना मराठे, आसावरी दिवाण, रेवती मांडके, जया कुर्लेकर, अनिता जोशी, सीमा राणे यांच्यासहित ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading