पक्षातील बहुमत सिद्ध करा, निवडणूक आयोगाचे ठाकरे आणि शिंदेंना निर्देश
मुंबई : “शिवसेना पक्षातील तुमचे बहुमत सिद्ध करा,” अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘शिवसेनेत आपल्याला पाठिंबा आहे, हे सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे शिवसेनेच्या दोघांनी गटांना निवडणूक आयोगात जमा करावेत, असे निर्देश आयोगाने दिले आहे.’
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना एक पत्र पाठवून याविषयीची माहिती मागवली आहे. दोन्ही गटांनी या पत्राला 8 ऑगस्ट 2022 पर्यंत उत्तर द्यावीत, असंही आयोगाने म्हटलं आहे.
अधिकाधिक आमदार आणि खासदार आपल्या बाजूनं एकनाथ शिंदेंनी केल्यानंतर आता लढाई पक्ष संघटनेसाठी सुरू झाली आहे. पक्षावर ताबा कुणाचा, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे.
