Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेची ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलै रोजी

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला. तसेच एक दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षण काढण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने व सर्वोच्च न्यायालयात त्याबाबतचा निर्णय लवकर येत नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांना ओबीसी आरक्षणाचा विचार न करता एसटी, एससी व सर्वसाधारण गटातील महिलांचे आरक्षण काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ३१ मे रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पुणे शहरात २३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्‍चीत करण्यात आले. तर ८७ ठिकाणी महिलांचे आरक्षणाची सोडत काढली होती. या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार हे स्पष्ट झाल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण कायम असल्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यानुसार ओबीसी आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
29 जुलै रोजी पुणे महापालिकेसह राज्यातील 13 महापालिका निवडणुकांसाठी सोडत काढली जाणार आहे.

पुणे महानगरपालिकेत ओबीसींच्या 47 जागा असणार आहेत. महापालिकेत एकूण 173 नगरसेवक आहेत. त्यातील 47 जागा या ओबीसीसाठी राखीव असतील. त्यातील 24 जागांवर ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे.

असा आहे सोडतीचा कार्यक्रम

26 जुलै रोजी या प्रकरणाची जाहिरात दिली जाईल.

29 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल

30 जुलै ते 2 ऑगस्ट रोजी आरक्षणावर प्रभाग निहाय हरकती मागवल्या जातील

5 ऑगस्ट रोजी हरकती सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading