fbpx

विमान प्रवासावर मिळवा भरघोस सवलत

मुंबई : स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची सुवर्णसंधी देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी पेटीएमने आणली आहे. पेटीएमने २१ ते २३ जुलै दरम्यान ट्रॅव्हल फेस्टिव्हल सेलचे आयोजन केले असून त्याद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, गोएअर आणि एअर एशियाच्या विमान तिकीटावर अनुक्रमे १५ आणि १० टक्के सूट मिळणार आहे.

दरम्यान कंपनीद्वारे विशेष कॅशबॅक ऑफरचीही सवलत देण्यात आली आहे. केवळ विमान प्रवासासाठीच नव्हे तर अॅपद्वारे बस तिकिटाच्या नोंदणीवरही कंपनीने आकर्षक ऑफर आणली आहे.सशस्त्र दल, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिरीक्त सवलतींसह विशेष भाडे सवलतदेखील आहे. एचएसबीसी कार्ड वापरकर्त्यांनाही ही सवलत मिळू शकते.

पेटीएम अॅपवरून बुक केलेल्या प्रत्येक बस तिकिटावर कॅशबॅकसह आकर्षक सवलत मिळणार आहे. पेटीएम देशातील २५०० हून अधिक बस ऑपरेटरच्या माध्यमातून तिकीट सेवा उपलब्ध करते.  ग्राहकांनी बसचे तिकीट नोंदणी करताना १५ रुपये भरून बस कॅन्सलेशन प्रोटेक्शन घेतले तर त्यांना त्यांच्या तिकीटावर १०० टक्के परतावाही मिळू शकतो. पहिल्यांदाच या अॅपद्वारे बस तिकीट घेत असल्यास २० टक्के कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो.

पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे, हॉटेल्स, शहरांतर्गत बस आणि रेल्वे तिकिटांची नोंदणी सुविधा देते. कंपनीची सर्व प्रमुख देशांतर्गत विमान कंपन्यांशी भागीदारी असून ती आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंटही आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही छुप्या खर्चाशिवाय किंवा अतिरिक्त शुल्काशिवाय सवलतीच्या दराचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: