fbpx

बारामतीत २९ जुलैला धनगर आरक्षणप्रश्नी आंदोलन

पुणे : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणप्रश्नी बारामती येथे २९ जुलै २०२२ रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २९ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ते मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. या फसवणुकीची आठवण ठेवत असल्याचा इशारा देण्याबरोबरच नव्या सरकारने सकारात्मक पावले उचलण्याचा आग्रह असल्याचे ढोणे यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात ढोणे यांनी बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज अनेक वर्षांपासून अनुसुचित जमातीच्या (एसटी) आरक्षणासाठी संघर्ष करतो आहे, मात्र समाजाला आजवर न्याय मिळालेला नाही. सातत्याने समाजाच्या पदरी
निराशाच आलेली आहे. राजकीय मंडळींनी षढयंत्रपुर्वक फसवल्यानेच समाजाची ही दुर्दशा झालेली आहे. याप्रश्नी एका बाजूला समाज प्रबोधन करत असताना दुसऱ्या बाजूला शासनाला कृतीशील भुमिका घेण्यास आम्ही भाग पाडत आहोत. त्याचाच भाग म्हणून बारामती येथील प्रशासकीय इमारतीसमोर २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आम्ही लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत. धनगर एसटी आरक्षणप्रश्नी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, आरक्षणप्रश्नी तातडीने मंत्री समिती स्थापन करावी, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत दिलेल्या आश्वासनाचा कृतीकार्यक्रम जाहीर करावा, न्यायालयीन लढ्यासाठी राज्य शासनाने सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र दाखल करावे, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: