fbpx

महिलेला रात्री सुरक्षितपणे घरी पोहचविणाऱ्या पीएमपीएमएल’च्या चालक-वाहक यांचा क्रेडाईतर्फे सत्कार

पुणे  : रात्रीच्या वेळी एका लहान मुलासह एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला सुरक्षितरित्या तिच्या घरी सोडण्यास मदत करणारे पीएमपीएमएल’चे चालक-वाहक अरुण दसवडकर आणि नागनाथ ननावरे यांचा क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे सत्कार करण्यात आला.

पीएमपीएमएल’च्या कार्यालयात करण्यात आलेल्या या सत्कार प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, उपाध्यक्ष राजेश चौधरी, संस्थेच्या सीएसआर आणि बाँडिंग कमिटी’चे सदस्य आणि सीपीएम टाईम्स’चे संपादक संजय देशपांडे उपस्थित होते. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीएम टाइम्सची एक प्रत मिश्रा यांना भेट दिली. यामध्ये मिश्रा यांनी सार्वजनिक वाहतुकीबद्दल व्यक्त केलेल्या मतावरील लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

याबाबत डॉ. अभ्यंकर म्हणाले, “ पीएमपीएमएल’चे चालक-वाहक यांनी केलेल्या कार्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशित झाल्यानंतर त्याची दखल घेत, क्रेडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरविले.  या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून, नागरिकांच्या चांगल्या कार्याचा आदर करण्याच्या हेतूने आम्ही हा सत्कार केला आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: