fbpx

वाल्मिकी समाजाच्या नेत्या मीरा बिघे यांचा समर्थकांसह आम आदमी पक्षामध्ये प्रवेश

पुणे : वाल्मिकी समाजाच्या नेत्या मीरा हेमंत बिघे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत हेमंत बिघे, अनिल चौरे, चंद्रकांत शेलार यांच्यासह अनेक समर्थकांनी मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या हस्ते त्यांचा आज आम आदमी पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. आम आदमी पक्षाचे वाहतूक विंगचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्रीकांत आचार्य, राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय समन्वयक किरण कांबळे, सरफराज मोमीन, सुजित अग्रवाल, सुदर्शन जगदाळे, आबासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

मीरा हेमंत बिघे यांनी काशेवाडी परिसरामध्ये रेशन, पाणी या सहित अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचा काम केलेले आहे. गेली 25 वर्ष त्या सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत. महिलांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

समाज परिवर्तनाला व्यवस्था परिवर्तनाची जोड देण्यासाठी आणि भ्रष्टाचार मिटवून सर्वसामान्य लोकांना दर्जेदार सुविधा मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाचा झाडू फिरवण्याची गरज यावेळी बोलताना मीराताई बिघे यांनी मांडली.

यावेळी सर्व उपस्थितांचे आम आदमी पक्षामध्ये स्वागत करताना आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी भावी पिढ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आम आदमी पक्षाचा पर्याय सक्षमपणे रुजण्याची गरज व्यक्त केली. पुण्यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आपचे स्वागत होत असून येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी आप प्रयत्नशील असे मनोगत विजय कुंभार यांनी मांडले.

यावेळी किरण कांबळे, सर्फराज मोमीन, डॉ अभिजीत मोरे, श्रीकांत आचार्य यांनी मनोगते व्यक्त केली.

Leave a Reply

%d bloggers like this: