Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

देवेंद्र फडणवीस पुण्याचे नवे पालकमंत्री ?

पुणे : भाजपच्या मदतीने राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. आता नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे घेण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री म्हणून पुणेकरांसमोर येवू शकतात. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पुणे शहर आणि जिल्हा ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरणार आहेत. देवेंद्र फडणवीस सध्या पुणे- पिंपरी- चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, जिह्यातील सहकारी साखर कारखाने आदींच्या निवडणुकांवर लक्ष ठेवून आहेत. येत्या काळात ते पुण्याच्या पालकमंत्रीपदाची देखील हाती घेऊ शकतात, असही शक्यता आहे. दरम्यान, नुकतेच शिंदे सरकारने पुणे जिल्ह्याच्या ८७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे. तो याच रणनीतीचा भाग असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading