fbpx

अंगूरी भाभी ऊर्फ शुभांगी अत्रेला झाली दुखापत

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणा-या शुभांगी अत्रेचे तिच्‍या लोकप्रिय विनोदी मालिकेसह सर्वांना हसवण्‍याप्रती तिची समर्पितता व अथक मेहनतीमुळे अनेक चाहते आहेत. नुकतेच प्रतिभावान अभिनेत्रीला घरी तिचा हायड्रॉलिक पलंग उचलताना पाठीत स्‍नायूदुखीचा तीव्र त्रास झाला. डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याचा देखील सल्ला दिला.

शुभांगी अत्रे  म्‍हणाली, ”मला २०१० मध्‍ये गंभीर दुखापत झाली होती आणि आजही मला त्‍या दुखापतीचा त्रास होतो. मी नकळतपणे अवजड वस्‍तू उचलते तेव्‍हा मला पाठीत स्‍नायूदुखीचा त्रास होत मोठी कळ जाते. मी काही दिवसांपूर्वी माझ्या हायड्रॉलिक पलंगाची स्प्रिंग तुटल्‍याचे पाहिल्‍यानंतर तो पलंग उचलण्‍याचा प्रयत्‍न केला. परिणामत: संपूर्ण पलंगाचे वजन माझ्या पाठीवर आले, ज्‍यामुळे मला खूप वेदना झाल्‍या. मी तीन ते चार तासांपर्यंत हलू शकले नाही आणि वेदना असह्य झाल्‍या. त्‍यानंतर मी डॉक्‍टरांकडे गेले, ज्‍यांनी मला तीन दिवस विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला दिला आणि पेनकिलर्स व इतर औषधे दिली. त्‍यांनी मला अधिक खबरदारी घेण्‍याचा आणि जीवनात कधीच अवजड वस्‍तू न उचलण्‍याचा सल्‍ला दिला.” अभिनेत्री मालिका ‘भाबीजी घर पर है’च्‍या सेटवर परतली आहे. 

ती पुढे म्‍हणाली, ”मला शूटिंग करायला आवडते आणि घरी अधिक काळ राहू शकत नाही. म्‍हणून मी आमचे निर्माते बिनायफर कोहली यांच्‍यासोबत माझ्या स्थितीबाबत चर्चा केली आणि प्रॉडक्‍शन टीम माझी स्थिती लक्षात घेऊन शूटिंगचे नियोजन करत आहे. मी माझ्या सर्व सीन्‍सचे शूटिंग खुर्चीवर बसून करत आहे. तसेच मला जलदपणे न चालण्‍याचा, न वाकण्‍याचा किंवा पाय-या न चढण्‍याचा देखील सल्‍ला देण्‍यात आला आहे. ते तळमजल्‍याला तात्‍पुरता बेडरूम बनवण्‍याचे नियोजन करत आहेत, कारण मी पहिल्‍या मजल्‍यावरील बेडरूमपर्यंत जाण्‍यासाठी पाय-या चढू शकत नाही. मला सांगावेसे वाटते की, माझी टीम शूटिंगदरम्‍यान माझी उत्तम काळजी घेण्‍यासोबत मला आराम देत आहे. अशा साह्यभूत व अद्भुत टीमसोबत काम करताना नेहमीच आनंददायी वाटते. शूटिंग व मनोरंजन करण्‍याचा आनंद दुखापतीमुळे मला होत असलेल्‍या वेदनांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: