fbpx

आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजना सादर

मुंबई : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL) ची जीवन विमा उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (ABSLI) ने मुदत पूर्ण झाल्यावर एकरकमी म्हणून संपूर्ण हमी लाभ देणारी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग एंडोमेंट ही नव्या युगातली  बचत सुविधा एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (UIN 109N135V01सादर करत असल्याची घोषणा केली आहे. विमाधारकांना मुदतठेवीपेक्षा जास्त परतावा आणि सुरक्षा यांचा मेळ घालत अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली ही योजना आहे.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजनेची ठळक वैशिष्ट्ये 
•	सरलीकृत डिझाइन वन-टाइम सिंगल पे (सिंगल प्रीमियम पेमेंट टर्म) कमीत कमी योजनेची मुदत ५ वर्षे, जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत 
•	कोणत्याही खर्चाशिवाय पूर्ण तरलता- पॉलिसी लवकर सरेंडर केल्यावर कोणताही दंड नाही
•	एफडी बीटिंग रिटर्न- ६.४१ % पर्यंत 
•	खात्रीशीर मॅच्युरिटी लाभ- संपूर्ण हमी लाभ देणारे एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग एंडोमेंट उत्पादन 
•	सम अॅशुअर्ड विविध पर्याय - 1.25X to 1.77X किंवा 10X to 10.42X 
एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजना उद्योगातील सर्वोत्तम म्हणजे जीवन विम्यासह ६.४१% पर्यंत परतावा देते. हे व्याजदर देशातील बहुतांश प्रमुख बँकांद्वारे मुदत ठेवीवर दिल्या जाणाऱ्या दरांपेक्षा जास्त आहेत.

आपल्या नवीन सरलीकृत बचत सोल्यूशनद्वारे एबीएसएलआय आपल्या विमाधारकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्रास-मुक्त आर्थिक हमी मिळण्‍यात मदत करते.

ही योजना मुदत ठेवीप्रमाणे एकल पे प्रस्ताव (प्रिमियम पेमेंट टर्म) आहे आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पॉलिसीधारकांना योजनेच्या मुदतीच्या (५ ते १० वर्षे) विस्तृत श्रेणीतून निवड करण्याची अनुमती देते. पॉलिसीधारकांना जर योजना सरेंडर करायची असेल तर त्यांचा पैसा वाया जाणार नाही याची खात्री करत शिवाय १००% नी सुरुवात करत सरेंडर बेनीफिट दरवर्षी १% ने वाढेल. आपल्या या नव्या

सादरीकरणातून एबीएसएलआय मुदत ठेवी सारख्या सरलीकृत उत्पादनांना पसंती देत असलेल्या गुंतवणूकदारांना सेवा देतात.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन सादर करताना त्याबद्दल आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलेश राव म्हणाले, “या अनिश्चिततेच्या युगात आम्ही आमच्या विमाधारकांना आवश्यक आर्थिक हमी आणि कोणत्याही प्रसंगात त्यांना योग्यरित्या संरक्षण सुविधा प्रदान करण्यासाठी सतत मदत करण्यास उत्सुक आहोत. एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन त्यांच्या सर्व स्वप्नांसाठी आवश्यक आर्थिक हमी देते आणि उद्योगातील सर्वोत्कृष्ट परताव्यासह त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्याची मुभा देतेयामध्ये त्यांना सर्वसमावेशक जीवन विमा संरक्षण देखील मिळते. त्यामुळे आकस्मिक घटना घडल्यास त्यातून त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होते. मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा देत ही योजना विमाधारकांना जीवन विमा बचत योजनेच्या सर्व पारंपरिक वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यास सक्षम करते.”

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन विविध सम अॅश्युअर्ड रकमेतून निवड करण्याचा लाभ देते. पॉलिसीधारक एकतर पर्याय ए (1.25X ते 1.77X सम अॅश्युअर्ड) किंवा पर्याय बी (10X ते 10.42X सम अॅश्युअर्ड) निवडू शकतात. परतावा विमा रकमेच्या निवडीवर अवलंबून असेलअशा प्रकारेपर्याय ए पर्याय बी च्या तुलनेत जास्त परतावा आकर्षित करेल.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

·         गॅरंटीड मॅच्युरिटी: बाजारपेठेची परिस्थिती कशीही असली तरी ग्राहकांना पूर्णपणे खात्रीशीर हमी फायदे मिळतील

·         आर्थिक सुरक्षा: विमा उतरविलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ग्राहकांना सर्वसमावेशक जोखीम संरक्षण मिळेल

·         लवचिकता: ग्राहकांना पॉलिसीच्या मुदत (५-१० वर्षे) आणि सम अॅश्युअर्ड पर्यायात निवड करता येणार

·         पॉलिसी कर्ज: लागू सरेंडर व्हॅल्यूच्या त्या तारखेपर्यंत कोणतीही थकबाकी पॉलिसी कर्ज शिल्लक कमी असताना किमान पॉलिसी कर्ज ५००० रुपये असू शकते आणि प्लॅन ऑप्शन ए साठी कमाल ८०% आणि प्लॅन ऑप्शन बी साठी ६५%.

·         कर लाभ: कर लाभ प्रीमियम भरताना किंवा लाभ मिळाल्याच्या वेळी प्रचलित कर कायद्यांच्या अधीन असतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल प्रवेश वय ६० वर्षे (पर्याय अ) आणि ५० वर्षे (पर्याय ब)तर किमान वय ८ वर्षे आहे. शिवायकिमान वार्षिक प्रिमियम १२००० रु. आणि किमान विमा रक्कम १५००० रु.आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: