Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

परीक्षण करण्यासाठी उत्सुक – सोनाली कुलकर्णी

डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर २७ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय. नुकतंच प्रेक्षकांना कळलं कि या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परीक्षकाची भूमिका निभावणार आहे. दुसरी परीक्षक असणार आहे अप्सरा सोनाली कुलकर्णी. संपूर्ण महाराष्ट्राला सोनाली कुलकर्णीच उत्तम नृत्यकौशल्य नवीन नाही. सोनाली कुलकर्णी हि परीक्षकाच्या भूमिकेसाठी योग्य आहे यात काही वादच नाही.
या कार्यक्रमातील आपल्या परीक्षकाच्या भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या परीक्षकाची भूमिका निभावण्याची जबाबदारी मला मिळाली आहे याचा मला आनंद आहे. झी मराठी आणि डान्स रिऍलिटी शो सोबत माझं नातं खूप आधीपासून आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक डान्स रिऍलिटी शो तो पण झी मराठीवर करताना मला खूप आनंद होतोय. त्याचसोबत या कार्यक्रमात लहान स्पर्धक असणार आहेत त्यामुळे मी खूप उत्सुक आहे कारण आताची पिढी हि खूपच जास्त टॅलेंटेड अहे. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं हे आम्हाला सोपं जाईल असं मला अजिबात वाटत नाही. हा कार्यक्रम खूपच रंजक असणार अहे कारण याचा फॉरमॅट देखील थोडा वेगळा आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading