fbpx

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


पुणे:महापालिकेतील बंडगार्डन पाणी पुरवठा विभागातील उपअभियंता आणि लिपीकाला २० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईत पकडले. पाण्याच्या टँकरला पास देण्यासाठी ही लाच घेण्यात आल्याचे एसीबीने सांगितले.
उपअभियंता मधुकर थोरात आणि लिपीक अजय मोरे अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तक्रारदार यांचे पाण्याचे टँकर आहे. पालिकेकडून पाणी टँकर पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी वाटप टँकरला पास दिला जातो. हा पास देण्यासाठी तक्रारदारांकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. याबाबत त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार, सायंकाळी सापळा कारवाईत या दोघांना २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

Leave a Reply

%d bloggers like this: