परीक्षा आणि निकालात अनेक त्रुटी, अभाविप आक्रमक
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत.तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा उद्या संपणार आहेत मात्र परीक्षेत अनेक त्रुटी राहिल्या आहेत.
२०१९ नंतर नवीन पेपर पॅटर्न पद्धतीने ही पहिलीच ऑफलाईन परीक्षा होती, यात Questions Bank देणे गरजेचे होते मात्र त्यात कुठेही ताळमेळ दिसून आला नाही,विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत अशी परिस्थिती मिहिर चव्हाण आणि अन्य विद्यार्थ्यांनी मांडली. अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण शिकवलेला नाही, आणि अश्यातच विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षेला सामोरे गेले. अभ्यासाला कमी कालावधी मिळाल्याने सर्व विद्यार्थी तणावात आहेत. या विद्यार्थ्यांना घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून प्र-कुलगुरूंना खालील मागण्याचे निवेदन दिले.
१) Combine Passing ठेवावी, यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधी सुटणार नाहीत .
२) ATKT लागलेल्या विद्यार्थ्यांची पुनः परीक्षा निकालानंतर १ महिन्याच्या आत घेऊन तत्काळ निकाल लावण्याचे प्रयोजन करावे.
यासंदर्भात बोलताना प्र-कुलगुरू यांच्याकडून ‘विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. त्यांच्या अडचणीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल,विद्यार्थ्यांनी तणावात राहू नये.’असे सांगण्यात आले. विद्यार्थी हिताचा विचार करून निर्णय घ्यावा,अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी उपस्थित कार्यकर्ते महेश राहणे यांनी प्रशासनाला दिला. निवेदन देताना विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
