Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून विचारणा झाली होती – आदित्य ठाकरे

मुंबई : मागील मे महिन्यात आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी विचारणा झाली होती, असा गौप्यस्फोट आमदार आदित्य ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, 20 मे रोजी वर्षावर एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आले होते. तेव्हा त्यांना मुख्यमंत्री पदासाठी तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारले होते. आज न्यायालयात प्रकरण असताना देखील फडणवीस – शिंदे सरकारने विश्वास दर्शक ठराव घेतला. तसेच आमचे आणखी एक आमदार शिंदे गटात गेले. मात्र, शिवसेना कधीही संपणार नाही. जेव्हा बंडखोर आमदार आपापल्या मतदार संघात जातील तेव्हा त्यांना जनता प्रश्न विचारेल.

आदित्य ठाकरे म्हणाले, आज ज्यांनी शिवसेना पक्षाचा व्हीप मोडला आहे, त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading