Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNESportsTOP NEWS

बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे शरद पवार अध्यक्ष असलेली राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त – संदीप भोंडवे

पुणे : भारतीय कुस्तीगीर संघाने, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हे स्वतः शरद पवार आहेत, त्यामुळे शरद पवार यांना हा एक मोठा धक्का समजला जात आहे.

पुणे जिल्हा तसेच राज्यांतील काही कुस्तीगीर संघाने भारतीय कुस्तीगीर संघाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघाने राज्याचा कुस्तीगीर संघ बरखास्त केला आहे. राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि त्यांचा मुलगा ललित लांडगे यांच्या मनमानी कारभारामुळे राज्याचा कुस्तीगीर संघ बरखास्त करण्यात आला असा आरोप पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे यांनी केला आहे.

दरम्यान राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत आहेत . असे संदीप भोंडवे म्हणाले आहेत .
या निर्णयामुळेदेशात हरियाणा आणि महाराष्ट्र हे दोन राज्य कुस्ती खेळामध्ये आघाडीवर आहेत. अशातच राज्यातील कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आल्याने राज्यातील पैलवानांना आगामी कुस्ती स्पर्धेत याचा मोठा फटका बसणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading