Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

दिल्ली येथे सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा गौरव

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी महाविद्यालयाला ‘पायोनिअर इन्स्टिट्यूट फॉर बीएस्सी (सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स-सीएस अँड डीएस) इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अचिव्हमेंट अवॉर्डस २०२२ सोहळ्यात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हॉपनॉच फाउंडेशन, इंडिया न्यूज आणि आऊटलूक व मेडगेट टुडे यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी लोकसभा खासदार मनोज तिवारी, दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता सिंग, अभिनेत्री इशा देओल यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी ‘सूर्यदत्त’मध्ये सुरु असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.

या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आधुनिक व डिजिटल युगात अनेक क्षेत्रात क्रांती होत आहे. डिजिटल गोष्टींचा वापर वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इंटरनेटचा प्रभाव मोठा आहे. परिणामी, सायबर सिक्युरिटीचा प्रश्नही निर्माण झाला असून, बँकिंगसह इतर मार्गांनी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर सिक्युरिटी हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सर्व प्रथम ‘सूर्यदत्त’ने सायबर सिक्युरिटीबाबतचा अभ्यासक्रम सुरु केला. या क्षेत्रात संस्थेची दमदार वाटचाल सुरु असून, दर्जात्मक शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास हा संस्थेचा ध्यास आहे.”

संस्थेच्या यशाबद्दल प्रा. आरिफ शेख, अंजली मुळीक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांनी अभिनंदन केले. या सर्व सहकाऱ्यांच्या, सायबर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. सायबर सुरक्षेविषयी जनजागृती वाढत आहे. भारताला डिजिटल साक्षर व सुरक्षित करण्याचा प्रयत्न सूर्यदत्तच्या वतीने करत असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading