Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

शिवसेना नेतेपदावरुन एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेने ने मोठी कारवाई  केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली आहे. पक्षाने  शिंदे  यांची शिवसेनेच्या नेते पदावरून  हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र प्रसिद्ध  केलं आहे.

पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षने नेतेपदावरून काढण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे 39 आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत.  तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. ही पक्षांतर्गत कारवाई नसून राष्ट्रीय कार्यकरणीत  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading