पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करा, मंत्रीमंडळ बैठकीत काॅंग्रेसची मागणी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले या .बैठकीत पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करा, अशी मागणी काॅंग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले जाणार आहेत. यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. यात मुख्यतः काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान यापूर्वी काही संघटनांनी पुण्याचे नामकरण जिजाऊनगर करण्याची मागणी केलेली आहे.
