काँग्रेस लिगल विभागाच्या वतीने केंद्र शासनाचा जाहीर निषेध
पुणे : केंद्र सरकार तर्फे विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध सुडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेचा बेकायदेशीर गैरवापर करण्यात येत असून, काँग्रेस पक्षातील मंत्र्यांना तसेच मा. मंत्री व पक्षकार्यकारिणीतील मुख्य पदाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सन्माननीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केला नसताना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने व काँग्रेस पक्षाची बदनामी करून या नेत्यांची प्रतिमा मलीन करून पक्षाचे नेते भ्रष्टाचारी असल्याचे भासवण्याकरीता सत्येचा दुरुपयोग करत असून हा सर्व प्रकार निंदनीय आहे असा केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर त्वरित थांबला पाहिजे याकरिता पुणे काँग्रेस लिगल विभागाच्या वतीने केंद्र शासनाचा जाहीर निषेध करून काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
हा कार्यक्रम काँग्रेस लिगल विभागाचे प्रदेश अध्यक्ष ऍड रवी जाधव यांच्या आदेशानुसार घेण्यात आला, याचे नेतृत्व लिगल विभागाचे अध्यक्ष ऍड राहुल ढाले यांनी केले तर आयोजन प्रदेश सचिव व शहर सह प्रभारी ऍड. फैयाज शेख आणि सरचिटणीस ऍड. राहुल कदम यांनी केले. आभार प्रदर्शन काँग्रेसचे संघटक सचिव ऍड. राजश्रीताई अडसूळ यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज साठे (AICC सचिव ) आणि लिगल सेल विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर, प्रदेश सचिव ऍड.संजय साळवी ,महिला शहर विभागाचे सह प्रभारी ऍड. वीभा सिंग, शहर सेक्रेटरी ऍड. विद्या पेळपकर, ऍड. रशिदा सय्यद व पूजा भोसले शहर, जिल्हाचे समन्वयक व सेक्रेटरी ऍड अश्विनी गवारे, सरचिटणीस ऍड देवयानी दूरकर,ऍड. संगमित्रा कांबळे, ऍड. गुलणार शेख, ऍड. पुष्पा लोंढे,ऍड. श्रीकांत पाटील, ऍड विजय तिकोने, ऍड बाळासाहेब बावणे, ऍड. विठ्ठल आरुडे, ऍड अतुल गुंड पाटील, ऍड. विजय राऊत,ऍड. राजेंद्र काळेबेरे, ऍड.इर्शाद शेख, ऍड. शेरीकर,ऍड. आडागळे इत्यादी उपस्थित होते.
