Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

येत्या पाच दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; विदर्भात उष्णतेची लाट

पुणे : मान्सून केरळमध्ये दाखल झाल्या पासून तो राज्यात कधी येणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, मान्सूनचे राज्यात आगमन होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण मान्सूनचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसात राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे.

IMDने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 7 जूनपासून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 5 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता. तर महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास वेळ लागणार असून विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात येत्या पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading