कोविड-१९ निर्बंध असूनही तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला तब्बल २०० कोटीचा महसूल 

मुंबई : विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय, मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आणि विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. महसुलाची गळती रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे दक्षता पथक तिकीट तपासणी कर्मचार्‍यांसह विनातिकीट प्रवासाविरुद्ध अशा मोहिमा राबवत असतात. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला तब्बल २०० कोटीचा महसूल मिळाला आहे. कोविड-१९ निर्बंध असूनही मध्य रेल्वेची आतापर्यंतची ही सर्वाधिक कमाई आहे.

एप्रिल २०२१ ते १६ मार्च २०२२ (१.४.२०२१ ते १६.३.२०२२) या कालावधीत विनातिकीट प्रवासाची  एकूण ३३.३० लाख प्रकरणे आढळून आली. यातून २०० कोटी ८५ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. जो सर्व क्षेत्रिय रेल्वेमध्ये प्रकरणे आणि महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे.

मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार मुंबई विभागाने तिकीटविरहित आणि अनियमित प्रवासाची १२.९३ लाख प्रकरणे शोधून काढली असून रु. ६६.८४ कोटी वसूल केले आहेत.  जे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक आहेत. भुसावळ विभागात अनियमित प्रवासाची ८.१५ लाख प्रकरणे आढळून आली असून ५८.७५ कोटी रुपये, नागपूर विभागात ५.०३ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून ३३.३२ कोटी. सोलापूर विभागात ३.३६ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १९.४२ कोटी. पुणे विभागात २.०५ लाख अनियमित प्रवासाच्या प्रकरणांतून १०.०५ कोटी आणि मुख्यालयाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची १.८० लाख प्रकरणे शोधून काढली आणि रु. १२.४७ कोटी वसूल करण्यात आली.

वरील व्यतिरिक्त या कालावधीत सर्व ५६,४४३ व्यक्ती कोविड योग्य वर्तनाचे उल्लंघन केल्याबद्दल आणि मास्क न परिधान केल्याबद्दल आढळून आले आणि त्यांच्याकडून ८८.७८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: