fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) नवीन बसमार्ग सुरू

पुणे : आज (दि. २८) पासून पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक २२० – यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. यावेळी भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्यापासून वाघापूर चौफुला पर्यंत बससेवेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष  दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते या बससेवेचा शुभारंभ भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते,
भुलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, शेवाळेवाडी डेपो मॅनेजर सोमनाथ वाघोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार संजय जगताप म्हणाले, ही बससेवा माळशिरस, टेकवडी, आंबळे,
राजेवाडी, वाघापूर चौफुला परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना उपयुक्त ठरेल. सासवडच्या विकासात पीएमपीएमएलचे योगदान मोठे आहे. लोकप्रतिनिधींनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा वापर केल्यास नागरिकही या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करतील. नवीन सुरू झालेला कोणताही बसमार्ग टिकवणे आपल्या हातात असते. त्यासाठी खाजगी वाहनांचा वापर टाळून आपण सर्वांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.

मार्ग क्रमांक २२० – यवत ते सासवड (मार्गे भुलेश्वर) या बससेवेचा मार्ग यवत, भुलेश्वर, माळशिरस, टेकवडी, आंबळे, राजेवाडी, वाघापूर चौफुला, सिंगापूर, उदाचीवाडी, वनपुरी, आंबोडी, सासवड असणार आहे. सध्या या मार्गावर ४ बसेस द्वारे साधारणपणे दर दीड तासाने बससेवा उपलब्ध असेल. यवत ते सासवड एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. यवत ते सासवड पहिली बस सकाळी ६.३० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.०० वा. आहे. तसेच सासवड ते यवत पहिली बस सकाळी ७.५५ वा. तर
शेवटची बस रात्री ८.०० वा. आहे.

भुलेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी या बससेवेचे उदघाटन झाल्यानंतर पुढे माळशिरस, भुलेश्वर विद्यालय, टेकवडी, आंबळे, राजेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी बससेवेचे स्वागत केले. या बसचे चालक शिवलिंग पवार व वाहक अमृत बोरकर यांचा ठिकठिकाणी
सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading