मनसे चे प्रशासनाविरुद्ध खड्डे बुजवा आंदोलन
पुणे: प्रभाग क्र. 28 आणि 29 मधील *घोरपड़े उद्यान, खडकमाळ आळी, शिंदे आळी, छत्रपती शिवाजी रस्ता, गवरी आळी, मासेआळी, बदामी हौद चौक, मोमिनपुरा इ. परिसरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले असून देखील गेले पाच वर्षे स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करत आले आहे, त्यांना आणि प्रशासनाला ही याचे गांभीर्य कळावे म्हणून मनसेतर्फे “खड्डे बुजवा” आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या वसंत खुटवड, रवि सहाणे, नीता पालवे, आनंद कुंदूर, प्रवीण क्षीरसागर, सागर कारंडे, तेजस माने, सुरज पंडित, बबलू नाईक, आकाश सुरे, हृषिकेश करंदीकर, शंकर भोसले आदिंनी फावड़े घेवून, सिमेंट खड़ी आणि वाळु टाकून 8 ते 9 ठिकाणचे रस्त्यातील खड्डे बुजवले.
तसेच, सत्ताधारी आणि प्रशासनाला येत्या आठ दिवसात या सर्व भागातील खड्डे बुजविण्याचा इशारा दिला, अन्यथा मनसेतर्फे यापुढे आणखी तीव्र आंदोलन केले जाईल.
सदर आंदोलन मनसे कसबा उपविभागाध्यक्ष संग्राम तळेकर आणि मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
