fbpx
Saturday, April 27, 2024
BusinessLatest News

भारत व एशिया खंडातील हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये प्रथमच अकोही (ACOHI) अल्कालाईन मुव्हमेंटची सुरवात

पुणे : अकोही (ACOHI) एशियाच्या मुख्य कार्यालयातुन भारताच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये अल्कलाइन मूवमेंट ची सुरवात केली आहे, मानवी शरीरात 70% पाणी असते आणि म्हणूनच पाणी हा घटक सर्वात आवश्यक बनतो, तरीही या महत्वाच्या घटकाकडे पाहण्याचा दुष्टीकोण आजही मोठ्या प्रमाणात दुर्लक्षितच आहे.

अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सनी अवसरमल  यांनी पुण्यातील अकोही एशिया च्या मुख्य सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ते म्हणाले की, “या नव्या सुरुवातीमुळे हा उद्योग त्या सर्व उत्पादकांना आणि पुरवठादारांना संधी देईल जे अल्कालाईन वॉटर व्यवसाय करतात. या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत जे अनेक रोग व आजार बरे करतील असे संशोधकांचे म्हणणे आहे.  ज्यामुळे या व्यवसायात मोठी क्रांती घडेल.  याच्या वापरावर भाष्य करताना आम्ही हे सांगु इच्छितो की या पाण्याचे गुणधर्म पाहता मोठ्या आणि लहान स्टार हॉटेल्स , रेस्टॉरंट्सपासुन ते केटरिंग उद्योगापर्यंत प्रत्येकाने हे पाणी वापरावे. त्यांच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी हे खात्रीशीर आहे.  कोरोना नंतरच्या काळत स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषण याला जास्त महत्व दिले जात आहे जी भविष्याची मोठी गरज आहे.”

व्हीआरएच एक्वा चे अध्यक्ष निर्मल हिंदुजा म्हणतात की, “व्हीआरएच एक्वा ही भारतातील पहिली कंपनी आहे जिला त्यांच्या व्यवसाय प्रक्रियेच्या पडताळणीनंतर अकोही तर्फे विशेष सन्मानित व पुरस्कृत कलीनरी आईडी देण्यात आला आहे,  २०२२ च्या बीओजी पडताळनी नंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावर अकोही चेंबरमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहे. ते अल्कालाईन मशिन्सच्या विक्रीच्या दृष्टीने उद्योगांना सेवा देतात, सर्व्हिसिंग करतात आणि संपूर्ण भारतातील हॉस्पिटैलिटी उद्योगासाठी वार्षिक मेंटेनेन्स करार करू शकतात व याची खात्री देतात. त्यांच्याकडे एनाजिक ब्रँडच्या मशीन्सची विस्तृत श्रेणी आहे जी आरोग्यदायी पाणी तयार करते, ज्यांना कँगन वॉटर म्हणून व्यापकपणे ओळखले जाते. अकोही चेम्बरच्या कलीनरी आयडी आणि नॅशनल लिस्टमध्ये स्थान मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही उद्योग मानक आणि अपेक्षांनुसार कामगिरी करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading