आज दिवसभरात पुणे शहरात कोरोना चे 424 नवीन रुग्ण
पुणे : पुणे शहरात मागील आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख कमी होत चालला आहे. शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1377 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 6 लाख 56 हजार 955 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 42 हजार 048 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तर 2 पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या
5576 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 201 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5116 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
