बोपोडी येथील काकड आरतीचा मान सुनीता वाडेकर यांना मिळाला

पुणे: बोपोडी ग्रामस्थांच्या वतीने काकड आरतीचे आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहात होते.यावर्षी काकड आरतीचा मान पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर व रिपाई नेते परशुराम वाडेकर या दांपत्याला मिळाला.दोन्ही दाम्पत्याने विधिवत पूजाअर्चा करून प्रभागातील सर्व नागरिकांच्या आरोग्या संदर्भात विठुरायाला साकडे घातले.याप्रसंगी बोपोडीकर ग्रामस्थांनी या दोन्ही दाम्पत्यांचा मनोभावे स्वागत व सन्मान सत्कार करत माणुसकीचे दर्शन घडवले. या नयनरम्य सोहळ्याला सर्व बोपोडीकर ग्रामस्थ नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनीता वाडेकर म्हणाल्या,बोपोडी ग्रामस्थांच्या वतीने काकड आरतीचा मान मला मिळाला यांचा मला खूप आनंद होत आहे.असे सुनीता वाडेकर म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: