अमरावती घटनेच्या चौकशीच्या मागणीसाठी २२ नोव्हेंबर ला भाजपचे आंदोलन -चंद्रकांत पाटील

मुंबई: त्रिपुरा मधील एक वायरल व्हिडीओ त्यामुळे अमरावती , नांदेड , मालेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसक  घटनांमुळे अमरावतीत उस्फूर्तपणे नागरिक एकत्र आले त्यांच्यावर हल्ला झाला याच्या चौकशीच्या मागणीसाठी सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या आंदोलनात नागरिक, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले,२२ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात नागरिक व कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन ही दंगल नक्की कशामुळे झाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी
लोकांना महत्त्व सांगावे. ही घटना नक्की कशामुळे घडली. हे पण सांगावे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.   अमरावती , नांदेड, मालेगाव या घटनेची सुप्रीम कोर्टा तर्फे चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: