हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस त्यांच्या जन्मस्थळी अभिवादन

पुणे : हिंदुहृदसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक त्यांच्या जन्मस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदाशिव पेठेतील नागनाथ पार जवळील त्यांच्या जन्मस्थळी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. जन्मस्थळावर फुलांची आरास करण्यात आली होती. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले होते. गेल्या काही काळात कोरोनामुळे जन्मस्थळावर कार्यक्रम करण्यात आले नव्हते. पण यावर्षी शिवसैनिक जन्मस्थळावर दाखल झाले. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नववा स्मृतीदिन. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुण्यात झाला होता, त्यांच्या येणाऱ्या जयंती निमित्त जन्मस्थळी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जन्मउत्सव समिती स्थापन करून विविध सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि उपक्रम करणार असल्याचे असंघटित कामगार सेनेचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले.

यावेळी जिल्हाप्रमुख विजय देशमुख, शहरप्रमुख संजय मोरे , हडपसर विधानसभा विभागप्रमुख राजेंद्र बाबर, कामगार सेनेचे अनंत घरत, सदाशिव पेठ शाखेचे नंदू येवले, नितीन रावळेकर, युवासेनेचे युवराज पारीख, सनी गवते, राजेश मोरे, राहूल जेकटे, अक्षय फुलसुंदर, अजय परदेशी, नितीन बढेकर, सुरेंद्र जोशी, राजेंद्र मांढरे , निखिल जाधव, अरविंद दाभोलकर, विकास घोले , संजय रसाळ, विजय जोरी, समीर कोतवाल, ज्येष्ठ शिवसैनिक मारुती काका ननावरे, शाखाप्रमुख योगेश जैन, राजाभाऊ भिलारे, राहुल जाधव, संजय जगताप, राहुल दीक्षित, किरण शिंदे, मनोज शिंदे, रोहित पवार, अभिजित येवले, मोहन देशपांडे, मिलिंद माने, जीतू जठार उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: