देगलूर मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचा जल्लोष

पुणे: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोक  चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नांदेड, देगलुर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार  जितेश अंतापूरकर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला त्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज  काँग्रेस भवन  येथे पेढे ,फटाके फोडून व साखर वाटून व नाचून जल्लोष करण्यात आला.

या जल्लोषाच्या वेळी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप, ाजी आमदार मोहन जोशी,माजी महापौर कमल व्यवहारे,सोनाली मारणे,नगरसेवक अभय घाजेड,सौरभ आमराळे,नीता रजपूत,माजी आमदार दीप्ती चौधरी, चंद्रशेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, सुनील घाडगे, रजनी त्रिभुवन, अकबर शेख,  परवेश तांबोळी, रमेश सोनकांबळे, ज्योती परदेशी, राजाभाऊ कदम आदींसह  पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, देगलूर, विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोक  चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जितेश अंतापूरकर यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. अशोक चव्हाण साहेब
यांनी ठरवलेल्या नियोजनानुसार महा विकास आघाडी ला घणघिणीत यश भेटले आहे. नागरिक भाजप सरकारला एवढे वैतागले आहेत. येणार्‍या पुढच्या निवडणुकीमध्ये भाजपचा ठासुन पराभव होईल. असे रमेश बागवे म्हणाले.
मोहन जोशी म्हणाले, पेट्रोल डिझेल यांसारखे दर केंद्र सरकारने हे भरपूर वाढवले आहेत. नागरिकांच्या पण आता लक्षात येत आहे. जर भाजपला  मत दिली तर आपल्याला असाच महागाईचा सामना करावा लागेल. आज आम्ही भाजपचा उमेदवार पराभव झाल्यामुळे जल्लोष करत आहोत. पण येणाऱ्या पुढील निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस जल्लोष करेल. असे मोहन जोशी म्हणाले.

प्रशांत जगताप म्हणाले,महाविकास आघाडी सरकारने गेल्या २ वर्षात महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे केली आहे. केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्र सरकारला सातत्याने कुठल्या न कुठल्या पध्दतीने त्रास देण्याचे काम करीत आहे. हे जनता बघत आहे. त्यामुळे नांदेड, देगलूर, विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: