Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – पानशेत धरणातील पाणीसाठा 95 टक्के

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील एक असलेले पानशेत धरण 95 टक्के भरले आहे. धरणात 10.11 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पानशेत धरणातून पॉवर हाऊसमधून 600 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

दरम्यान, शुक्रवारी खडकवासला-2, पानशेत-17, वरसगाव-18 आणि टेमघर धरण क्षेत्रात 15 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून धरणात 1.97 टीएमसी इतके पाणी आहे. तर धरणातून नदीत 1 हजार 929 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव धरण 85 टक्के भरले असून धरणात 10.86 टीएमसी इतके पाणी आहे. तर टेमघर धरणात 2.76 टीएमसी म्हणजे 75 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण 25.71 टीएमसी म्हणजे 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading