राज्यात येत्या शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
पुणे: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे मात्र भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने 2 ऑगस्ट पर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे.
राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपूर्ण कोकण ,मुंबई ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,पुणे, कोल्हापुर ,सातारा जिल्ह्यात पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाने दोन जुलै पर्यंत हवामानाचा अंदाज जारी करताना विविध जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट यलो अलर्ट जारी केले आहेत. तर कोणत्या जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तर एक ऑगस्ट रोजी ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, पुणे, सातारा ,आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .
आज हवामान खात्याने कोकणाला दिलेल्या यलो अलर्टनुसार पाऊस पुन्हा कोकणात थैमान घालण्याची शक्यता आहे.
