Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – तूर्तास निर्बंध शिथिल नाहीच – दिलीप वळसे पाटील

पुणे : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाँटेल व्यावसायिक आणि व्यापारी यांनी विकेंड लाँकडाऊन रद्द करुन चारनतंर वेळ  वाढवावी अशी मागणी केली होती.मात्र पुण्यातील कोरोना निर्बंध तूर्तास शिथिल होणार नाहीत. असे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी दिले.पुणे विधानभवनाच्या सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

वळसे पाटील म्हणाले, कोरोना विषाणुवर नियंत्रण मिळविण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत. संभाव्य कोरोनाची तिसऱ्या लाटेचा विचार करता पहिल्या डोस घेतलेल्या नागरिकांना नियोजन करुन प्राधान्याने दुसरा डोस द्या अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी दिल्या. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेवून मनुष्यबळ वाढवा. औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम लक्षात घेवून कामगार विभागाशी चर्चा करुन कामगारांना वेळेत लसीकरण करण्यासाठी कक्ष स्थापन करा. लसीकरणाच्या अनुषंगाने दिलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करा. कोरोनाच्या मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading