Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता. आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले. रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबा सारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच सांगोल्याची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील पहिली महिलांसाठीची सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading