fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

रिंकु राजगुरूचा आगामी ‘200’ चित्रपट आहे सत्य घटनेवर

अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आगामी ‘200’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5 ने त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  न्यायावर आधारित या चित्रपटात रिंकू सोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, वरूण सोबती, साहिल खट्टर, सलोनी बत्रा, इंद्रनिल सेनगुप्ता आणि उपेंद्र लिमये यांच्या ही प्रमुख भूमिका असणार आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर शेअर करण्यात आला आहे. यात अनेक महिलांचे केवळ हात दिसत असून प्रत्येकीच्या हातात न्यायालयातील हॅमर आहे. एकदा दोनशे महिलांनी भर न्यायालयात एका आरोपीला ठार मारले होते, याच सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. सार्थक दासगुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading