Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONAL

Delhi – ममता बॅनर्जी यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली : दिल्लीतील 10 जनपथवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने ममता सध्या सक्रीय असल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ममता सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्या विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममतांनी सांगितले की, सोनिया गांधींनाही विरोधकांची एकजूट हवी आहे. काँग्रेसचा स्थानिक पक्षांवर विश्वास आहे आणि स्थानिक पक्षांनाही काँग्रेसवर विश्वास आहे असेही ममता म्हणाल्या. भाजप सध्या मजबूत स्थितीत आहे, 2024 मध्ये इतिहास रचला जाईल अशी आम्हाला आशा आहे. राजकारणात गोष्टी बदलत असतात. जेव्हा राजकीय वादळ येते आणि स्थिती हाताळणे कठिण होते, तेव्हा मोठे बदल होतात. जे केंद्र सरकारला विरोध करतात, त्यांच्याकडेच काळा पैसा आहे का? असा सवालही ममतांनी यावेळी विचारला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading