IRCTC च्या व्ह्लॉगिंग स्पर्धेत सहभागी व्हा, अन् एक लाखाचे बक्षीस जिंका
मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) अलीकडेच व्ह्लॉगिंग स्पर्धा आयोजित केली आहे. सहभागींना भारतीय रेल्वे आणि त्याच्या उत्पादनांवर व्हिडिओ बनवावा लागणार आहे. तर सर्वोत्तम व्हीडिओला प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेसाठी, आयआरसीटीसीने कोरोव्हरशी भागीदारी केली हे.
आयआरसीटीसीने ट्विटरवर पोस्ट शेयर करीत या स्पर्धेची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये अभिनेता शेखर सुमन या स्पर्धेविषयी माहिती देत आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी, व्हिडिओ, तयार करणे आणि सादर करणे आवश्यक आहे. ज्यात कोणत्याही भारतीय पर्यटनस्थळ, भारतीय रेल्वे, भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी ची उत्पादने आणि तिकिटे, कॅटरिंग, पर्यटन इत्यादी विषयी वैशिष्ट्यपूर्ण चित्रीकरण व माहिती अपेक्षित आहे. स्पर्धकांनी https://corover.ai/vlog/ या लिंकवर ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. एक स्पर्धक एक किंवा अधिक व्हिडिओ सबमिट करू शकतो. निवडलेले व्हिडिओ निर्मात्याच्या नावासह आयआरसीटीसीच्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केले जातील. 31 ऑगस्ट ही या स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख आहे.
#vlogger or #content #creators please watch what @shekharsuman7 has to say to Participate in #IRCTC & #CoRover vlogging contest by creating & uploading a video/vlog to stand a chance to win #exciting prizes. For more details https://t.co/fA6pPNR6wm https://t.co/jnUTPBh9Uy
— IRCTC (@IRCTCofficial) July 24, 2021
स्पर्धेतील विजेत्यास आयआरसीटीसीतर्फे 1 लाख रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येईल. उपविजेतेपदाला 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाईल तर दुसऱ्या उपविजेतेपदाला 25 हजार रुपय, प्रमाणपत्र व ट्रॉफी मिळेल. अर्जदारांनी सादर केलेल्या व्हिडिओची गुणवत्ता आणि सामग्रीच्या आधारे, आयआरसीटीसीतर्फे एकूण 300 विजेत्यांची घोषणा केली जाईल. सर्व विजेत्यांना (पहिल्या तिन्ही वगळता) 500 रुपयांचे गिफ्ट कार्ड आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
