भारत सरकारच्या क्रीडा व कला संघाचा प्रतिष्ठित असा “अटल अवॉर्ड” विशाल शेवाळे यांना प्रदान
पुणे : भारत सरकारच्या अटल भारत क्रीडा व कला संघाच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना दिला जाणारा अटल अवॉर्ड पुरस्कार यावर्षी महाराष्ट्रातून सामाजिक सेवेबद्दल डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेचे विशाल शेवाळे यांना प्रदान करण्यात आला .शेवाळे हे गेली 30 वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यारत आहेत त्यांना हा पुरस्कार देऊन पुणेकर आणि डिप्रेस्ड क्लास मिशन साठी हि अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेचे शेवाळे हे गेली 30 वर्षापासून कार्य करीत आहेत.नाना पेठ ,भवानी पेठ आणि पुणे शहरातील उपेक्षित ,दलीत ,कष्टकरी समाजातील मुलांना शिक्षणाचे कार्य ही संस्था करीत आहे .हा पुरस्कार करोना परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आला आहे .
