Pune गेल्या 24 तासात 304 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे.आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 216नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 304रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86हजार 071 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 74 हजार 789 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 6तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8742 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 2548 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 222रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5884 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
