क्रुणाल पांड्याला करोनाची लागण, दूसरा T20 सामना पुढे ढकलला
मुंबई : भारताचा स्पिन बॉलर आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या क्रुणाल पांड्या याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारत -श्रीलंकेदारम्यान खेळवला जाणारा दूसरा T20 सामना पुढे ढकलण्यात आला. क्रुणाल पांड्या याच्या संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंची RT-PCR टेस्ट आज केली जात आहे. जर सर्व खेळाडूंची करोना टेस्ट नेगेटिव्ह आली तर हा सामना उद्या (28 जुलै) खेळवला जाणार आहे, अशी माहिती बीसीसीआय ने ट्विट करून दिली आहे.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सुत्रांना दिलेल्या माहिती नुसार, आज सामना सुरू होण्यापूर्वी सगळ्या खेळाडूंची रॅपीड अॅ न्टी जेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये पांड्या पॉसिटीव्ह निघाला. सध्या सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या टेस्ट चे रिपोर्ट संध्याकाळ पर्यंत येणार आहेत.
दरम्यान, क्रुणाल पांड्या करोना पॉसिटीव्ह आल्यानंतर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू श्रीलंकेतच थांबणार की इंग्लंडला जाणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण यापूर्वीच या दोघांचीही इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
More details here – https://t.co/dk5b0EHoHw#SLvIND https://t.co/2y3s1ve9MC
— BCCI (@BCCI) July 27, 2021
