Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

जागा बळकवण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावून हवेत गोळीबार; ‘उद्योगी गायकवाड आणि गवारे कुटुंबावर’ गुन्हा दाखल…

पुणे: पिंपळे सौदागर येथील एका जेष्ठ महिलेची जबरदस्तीने जमीन व जागा बळकवण्यासाठी तीच्या मुलाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून बळजबरीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सहा घेतल्याचा प्रकरणी सोनाली गवारे आणि दिपक गवारे यांना तीन दिवसाची पोलीसाची कोठडी मिळाली असून इतर आरोपी फरार आहेत.

दीपक गवारे (वय 45) आणि सोनाली गवारे (वय 40, रा. डेक्कन) या आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोघांसह नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (रा. औंध), राजू उर्फ अंकुश, सचिन वाळके, संदीप वाळके (दोघेही रा. विधाते वस्ती) अशा एकूण आठ जणांवर चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पिंपळे सौदागर येथील 62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली आहे.

आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात गायकवाड आणि गवारे या दोन्ही कुटुंबावर तब्बल 25 गुन्ह्यांची नोंद झाली असून इतके दिवस आरोपीचे मावसभाऊ राजकीय व्यक्ती असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नव्हती अशी चर्चा होती. मात्र आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या क्रुरकर्मा सावकार गायकवाड व गवारे कुटुंबीयांवर कारवाईचा चांगलाच बडगा उचलला आहे. त्यामुळे आतापर्यंत शेकडो कुटुंबीयांची पिळवणूक आणि लुबाडणूक हे कुटुंबिय करत होते अशा पिडीतांना आता दिलासा मिळाला आहे. तसेच या पिडीतांची गेलेली प्रॉपर्टी परत मिळण्याच्या आशा या कारवाईने पल्लवीत होत असल्याने अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading