Monday, September 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Delhi – महाराष्ट्र सदन मध्ये आग

नवी दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदन मध्ये आग लागली आहे. महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये सोमवारी सकाळी ही आग लागली. शॉर्ट सर्किट हे या आगीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सदन हे महत्त्वाचं ठिकाणं असून ही आग लागल्यानंतर संपूर्ण यंत्रणा तेथे हजर झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेला कक्ष हा वेगळ्या ठिकाणी असल्याने इतर कोणत्याही कक्षाात ही आग लागली नाही. असे असले तरी इतर खबरदारीच्या उपाययोजना याठिकाणी घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळतेय. ही घटना घडल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि ही घटना नेमकी कशी घडली याचा पंचनामा पोलिसांकडून सध्या सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी साधारण साडेनऊ वाजेच्या सुमारास लागली. महाराष्ट्र सदनातील जवानांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading