शब्दकोडे हे बुद्धिला दिलेले एक आव्हान – डाॅ. मोहन आगाशे
पुणेः शब्दकोडे हे केवळ वेळ घालवण्याच साधन नसून आपल्या बुद्धिला दिलेले ते एक आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ मानसउपचार तज्ज्ञ आणि ज्येष्ठ कलाकार डाॅ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
क्षमा एरंडे लिखीत अभिनव शब्दको़डी डोक्याला खुराक या पुस्तकाचे आज डाॅ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लेखिका क्षमा एरंडे, प्रसिद्ध शब्दकोडे तज्ज्ञ आणि महाकाय शब्दकोड्याच्या निर्माते आणि शब्दकोडे क्षेत्रात योगदान दिलेले मिलिंद शिंत्रे, ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ वासुदेव परळिकर, अॅड. रोहित एरंडे, प्रसिद्ध व्हॉयलीन वादक निलीमा राडकर, याेगेश रिडबुडकर, सतिश पुरंदरे, मंजिरी कर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ. मोहन आगाशे त्यांच्या मनोगतात म्हणाले, शब्दकोडे हे म्हणजे मानसिक चाचण्याचे एक साधन होऊ शकते. बुध्यांक आणि भावनांक मोजायचा झाल्यास शब्दकोडे चांगला पर्याय होऊ शकतो.शब्दकोडी सोडवायला खरे आपण सर्वसाधारणपणे निवृत्तीनंतर सुरवात करतो पंरतू हे शब्दकोडी सोडविण्याचा प्रात्येक्षिक लहानपणापासून झाले पाहिजे.
शब्दकोडे तज्ज्ञ मिलिंद क्षिंत्रे त्यांच्या मनोगतात म्हणाले, ही शब्दकोडे प्रभावी आणि दर्जेदार आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शब्दकोडे सोडविणा-यांना मोठा खजीना उपलब्ध झाला आहे.शब्दकोडी सोडविणे हे सकारात्मक व्यसन आहे. लहानांपासून थोरांपर्यंत शब्दकोडे सोडविण्याचा प्रत्येकाने सराव ठेवला पाहिजे. यामुळे मेंदू क्रियाशील राहतो.
लेखिका क्षमा एरंडे आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ वासुदेव परळिकर यांनी देखील यावेळी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. एरंडे यांनी प्रास्ताविक केले तर अनघा परळीकर यांनी सुत्रसंचलन केले. अॅड. रोहित एरंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
