Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 181 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 181 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 331 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 466 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 866 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरात आत्तापर्यंत 8725 जणांचा कोरोना मुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2875 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 226 रुग्ण गंभीर आहेत. 
दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7620 स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत  अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading