Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

PUNE गेल्या 24 तासात कोरोनाचे  346 नवीन रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे परंतु मागील काही दिवसापासून शहरांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक आहे  पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 346 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 287रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 84हजार 702
इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73हजार 126इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 7तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8867जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2867अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत.
यामध्ये 227 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 9697स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading