Monday, June 15, 2026
BusinessLatest News

सोनालिका सम्राट हारवेस्टर बाजारात सादर

पुणे : शेतक-यांच्या गरजा समजून घेत उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवून त्या पूर्ण करणे सोनालिका ग्रुपसाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. फार्म उपकरणांच्या निर्मितीपासून सुरुवात करत कंपनीने हिमाचल प्रदेशातील आंब येथे प्रगत दर्जाची हार्वेस्टर निर्माण सुविधा स्थापन करण्यासाठी २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सोनलिकाची नवीन निर्मिती सुविधा २९ एकरांवर पसरली आहे आणि मल्टी-स्टेज सीईडी सह विकसीत केली गेली आहे जी पेंट प्रक्रिया सहसा कार निर्मिती सुविधांमध्ये पाहायला मिळते.

या १८ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह स्थापित, सीईडी पेंट प्रक्रियेत १४ स्टेज प्रक्रिया समाविष्ट आहे जी हारवेस्टरची गंज-मुक्त आणि दीर्घ कालीन कामगिरी सुनिश्चित करते.त्याचबरोबर, सोनालिका तर्फे सोनालिका सम्राट हा भारतातील सर्वात प्रगत हारवेस्टर २५. ५ लाख रुपये किमतीत सादर करण्यात आला आहे. हा स्वयंचलित हार्वेस्टर नेक्स्ट-जेन तंत्रज्ञानासह सुसज्ज आहे जो कापणीच्या हंगामा दरम्यान त्रासदायक श्रम कमी करतो इतकेच नाही तर आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्याने शेतकऱ्यांसाठी बचत करणारा ठरतो.

प्रोजेक्टर हेडलाइट्ससारख्या आधुनिक वैशिष्ट्यांसह सोनालिका सम्राट परिपूर्ण आहे. शेतकऱ्यांसाठी दीर्घकाळ चालणारे आकर्षक टेल-लम्प, आरामदायक आसन व्यवस्था आणि सोईनुसार हलवता येणारे स्टीयरिंग. त्याचे पॉवर पॅक्ड डिझेल इंजिन जे २,२०० आरपीएमवर १०१ एचपी पॉवर तयार करते आणि हळुवार ऑपरेशनसाठी जोडलेले ५ -स्पीड कॉन्स्टंट मेश गियरबॉक्स.  स्थिरतेसाठी सर्वात लांब फीडर असेंब्लीसह फिट केलेली ४ फीडर चेन यंत्रणा आहे .सुलभ देखभालसाठी सोनालिका सम्राट मध्ये हेवी ड्यूटी बीयरिंग आहे. जेणेकरून शेतकऱ्याची उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होते. 

सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमन मित्तल म्हणाले की शेतकऱ्यांना  प्रत्येक नवीन विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणे  हे सोनलिकाच्या डीएनए मध्ये आहे. शेतकरी त्यांच्या उत्पादन क्षमतेत आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने सतत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करतात. हिमाचल प्रदेशच्या आंब येथील आमचा नवीन प्रकल्प जागतिक दर्जाचे उच्चतंत्रज्ञान वापरून कापणींचे कार्य लक्षणीयरित्या वाढवण्यासाठी,  शेतकऱयांची उत्पादकता वाढविण्यासाठी स्थापित केला गेला आहे. ही अत्याधुनिक सुविधा आमच्या उत्पादनांमधून त्यांच्या खरेदीच्या वर्षांपासून जंग-मुक्त कामगिरीसाठी जागतिक दर्जाच्या सीई पेंट शॉपसह सुसज्ज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading