Pune – आर. एम. सी. असोसिएशनचा उद्यापासून सर्व प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय
पुणे: मागील तीन वर्षापासून डिझेल ,पेट्रोल, रॉयल्टी, वीज यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत त्याचबरोबर गाड्यांच्या आणि मशिनरीच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात सुद्धा वाढ झाली आहे .त्यामुळे उत्पादन काढण्यास परवडत नाही. या सर्व कारणांमुळे व आर एम सी दर वाढून मिळावेत यासाठी 19 जुलै 2021 रोजी झालेल्या पुण्यातील क्रश, सॅण्ड आणि खडी आर एम सी असोसिएशनच्या संघटनेच्या मीटिंगमध्ये 21 जुलै पासून जिल्ह्यातील सर्व बेमुदत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पुणे आर एम सी चे असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तानाजी वाघोले, सचिन काटे, चैतन्य रायसोनी, नरेंद्र पासलकर उपस्थित होते.
असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत आर एम सी उत्पादनात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. बुधवारपासून जिल्ह्यातील स्टोन क्रशरकडून होणारा मालाचा पुरवठा बंद आहे .क्रश सॅण्ड आणि खडी च्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे आर एम सी लॉन्टला उत्पादनात बाधा येत आहे .डिझेलच्या दारातही सातत्याने वाढ होत आहे म्हणून आम्ही उद्यापासून सर्व प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती प्रदीप वाल्हेकर यांनी दिली.
