Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

Pune – गेल्या चोवीस तासात  310 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज तर 276 नवीन रुग्ण

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव  कमी-जास्त होत आहे  . मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची कमी-जास्त होत आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या  वाढत  आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 276 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 310रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 84हजार 356 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 72हजार 839इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 12तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 6 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8702जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2815अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 229 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 6178स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading