Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

Pornography – राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई – पॉर्नोग्राफी ( Pornography) प्रकरणात अटकेत असलेला उद्योगपती आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ( Shilpa Shetty) पती राज कुंद्रा ( Raj Kundra) याला मंगळवारी किला कोर्टात हजर केले. याप्रकरणाचा मास्टर माईंड राज कुंद्रा असून आम्हाला त्याची अधिक चौकशी करायची आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी मुंबई पोलिसांच्या वकिलाने किला कोर्टात केली. त्यानंतर ही मागणी मान्य करत कोर्टाने राज कुंद्रा आणि त्याच्या दोन साथीदारांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आज झालेल्या सुनावणीत राज कुंद्राच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमं जामीन मिळण्यासारखी आहेत, त्यामुळे कुंद्राला कोठडी देऊ नये, असा कुंद्राच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या वकिलांनी सांगितले की, या गुन्ह्यात बरचसे परदेशी व्यवहार असल्याने याच्या तपासासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय आमचा तपास पूर्ण होणार नाही, गहना वशीष्ठ आणि वंदना तिवारी यांच्यासोबत कुंद्रा याच्या कंपनीने जे कॉन्ट्रॅक्ट केले होते, ते आम्हाला पडताळायचे आहेत. राज कुंद्रा या गुन्ह्यात मास्टरमाइंड असून त्यानेच हा प्रकार सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवल्याचे असल्याचेही मुंबई पोलिसांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

दरम्यान, पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा चौकशीनंतर राज कुंद्राला बेड्या ठोकल्या. तसेच याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज कुंद्राविरोधात फेब्रुवारी 2019मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीत राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading